Imran Khan : इम्रान खान यांच्यावर तुरुंगात लैंगिक अत्याचार? माध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्यांमुळे उडाली खळबळ

इस्लामाबाद : पाकिस्तानातल्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर अदियाला तुरुंगात लैंगिक अत्याचार करण्यात आले असल्याचे एक वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. दिनांक ३ मे रोजी हा प्रकार घडला असून इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीसाठी रावळपिंडीतल्या पाक अमिरात मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.
तेथे पाकिस्तान इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा निष्कर्ष आणि अहवालातील सत्यता पडताळणी अद्याप बाकी आल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले आहे. या वैद्यकीय अहवालामध्ये तपासणी करण्यात आलेल्या रुग्णाचे नाव इम्रान अहमद खान नियाजी असल्याचे म्हटले गेले आहे. तसेच लैंगिक अत्याचारांमुळे रुग्ण अस्वस्थ असल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे.
या अहवालात काही निरीक्षणांचे वर्णन देखील करण्यात आले आहे. रुग्णाला अंतर्गत इजा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज देखील या अहवालात नोंदवण्यात आला आहे. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे माध्यमांच्या सत्य पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्याचेही स्पष्ट केले गेले आहे. काही माध्यमांनी हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्टिकरण देखील प्रसिद्ध केले आहे. मात्र काही माध्यमांनी यावर कोणतेच स्पष्टिकरण दिले नाही. सरकारच्या बाजूने अथवा पीटीआय पक्षाच्या बाजूने यावर कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही.





