इम्रान-अवंतिका घेणार काडीमोड?

बॉलिवूडमध्ये काही कलाकार यशाच्या शिखरावर पोहचतात. शिखरावर असताना पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर त्यांच्या समोर अक्षरशः लोटांगणे घालतात. मात्र सर्वांनाच ही जागा टिकवता येते असं नाही. सतत माध्यमांच्या प्रकाशझोतात असणारे हे चेहरे कालांतराने लुप्त पावतात. प्रसिद्धीच्या शिखरावरून उतरल्यावर ते कोठे जातात, काय करतात याची कोणाला खबरही नसते ना त्यांचे हाल जाणून घेण्याची कोणाला इच्छा असते. असच एक नाव आहे ते म्हणजे इम्रान खान!
जाने तू या जाने ना चित्रपटातून सिनेसृष्टित पदार्पण केलेला इम्रान हिट ठरला होता. त्याच्या क्युटनेसवर अनेक चाहत्या फिदा होत्या. एकामागून एक हिट सिनेमे दिले. प्रसिद्धीच्या झोतात असताना त्याने गर्लफ्रेंड अवंतिका मलिक सोबत विवाह केला. त्यानंतर मात्र इम्रान बॉलिवूडमधून गायब झाला आहे.
अशातच आता अवंतिका मलिक व इम्रान यांच्यात घटस्फोट होणार असल्याचे वृत्त समोर आल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लग्नानंतर इम्रानला बॉलिवूडमध्ये संधी मिळत नसल्याने पैशांची चणचण भासत होती. याचा परिणाम त्याच्या कौटुंबिक आयुष्यावर देखील झाला.
आर्थिक अडचणींमुळे त्याची पत्नी अवंतिका आपल्या मुलीसह बऱ्याच वर्षांपासून माहेरी राहत आहे. त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला असून इम्रानने अवंतिकाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.





