E-Crop Survey: रब्बी हंगामासाठी सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप
Updated On:

मुंबई – राज्यात रब्बी हंगामात शेतकर्यांना ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप शासनाकडून उपलब्ध करून दिलं आहे. भविष्यात संपूर्ण राज्यात पीक पाहणी ही पूर्णपणे सुधारित ई-पीक पाहणी डिसीएस मोबाईल अॅपद्वारे होणार आहे.
त्यामुळे शेतकर्यांनी आपली पीक पाहणी या पद्वारे ठराविक मुदतीत करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही. यापुढे पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्यासाठी सहायकाची नेमणूक केली जात आहे.
प्रत्येक गावासाठी सहायक उपलब्ध राहणार असून सहायकामार्फत पीक नोंदणी होणार आहे. पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी डिसीएस मोबाईल पमध्ये पिकांची नोंद असणं आवश्यक आहे.





