वाल्मिक कराडला बीड कारागृहात ठेवण्यात महत्वाची भूमिका; अंजली दमानिया यांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप

Anjali Damania : राज्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात रोज नवंनवे आणि हादरवून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबातील सदस्यांवर आरोप ठेवण्यात आला आहे.
हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी डॅा. जालिंदार सुपेकर यांच्याविषयी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्ह्यातील कारागृहात ठेवण्यात जालिंदर सुपेकर यांनी महत्वाची भूमिका होती, अशी माहिती माझ्यापर्यंत आल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितली. त्यांनी केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
गन लायसन्स प्रकणातही सुपेकर यांनी पैशांची मागणी केली होती. सुपेकर आणि त्यावेळीचे तत्कालीन आयुक्तांनी शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात पैसे खाले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही याची चौकशी लावली आहे, त्याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. अनेक प्रकरणे बाकी आहेत. यातून आता अनेक खुलासे होतील, असे देखील अंजली दमानिया यांनी सांगितले.
…तर ते उद्या भाजपमध्ये जातील
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, अजूनही वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त केली नाही. वाल्मिक कराडला मोक्कामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा देखील दमानिया यांनी केला आहे. तसेच उद्या जाऊन ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: घसरणीला ब्रेक! शेअर बाजाराची वाढीसह ओपनिंग ; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला





