Shanaishwar Devasthan Trust : शनेश्वर देवस्थान ॲप घोटाळ्यात उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश

सोनई : अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील शनिश्वर देवस्थानमधील ॲप घोटाळा प्रकरण गाजत असताना राज्य सरकारच्या वतीने हंगामी प्रशासक म्हणून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची नियुक्ती केली. तसेच त्यांनी देवास्थानमधील कारभाराचा पदभार स्वीकारलाही होता. त्यांनी दैनंदिन कारभारासाठी कार्यकारी समिती म्हणून 11 जणांची समिती स्थापन केली होती.
त्यामध्ये उपजिल्हाधिकारी नेवासा तहसीलदार आणि अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या होत्या. मात्र या आदेशाला शनिश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिले होते. या याचिकेवर झालेल्या आजच्या सुनावणीत मागील विश्वस्त मंडळाचा 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले.
यामुळे राज्य शासनालने दिलेले आदेश रद्द होते की काय याकडे सर्व शनि भक्तांचे लक्ष लागले आहे. ॲप घोटाळा प्रकरण देशभर गाजत असताना न्यायालयाने वरील आदेश काढल्यामुळे पुन्हा एकदा शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाकडे हा कारभार आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता हा घोटाळा दाबला जातो की काय असेही बोलले जात आहे.





