पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! शहराच्या उत्तर-पूर्व भागात मंगळवारी पाणी बंद

पुणे – शहराच्या उत्तर-पूर्व भागासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या तातडीच्या कामासाठी आज या भागाचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. या पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहीनीत काही ठिकाणी गळती असल्याने तातडीनं हे काम करण्यात येणार आहे.

त्यामुळे, हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, परवा ( बुधवारी) उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. परिणामी लोहगाव, विमाननगर,वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्नांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी तसेच नगर रस्त्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.