मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.! शहरात पाणीकपातीची शक्यता, वाचा सविस्तर…
Updated On:

मुंबई – जून महिना संपत आला तरी अजून पावसाला सुरूवात झालेली नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तलावात केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त 6.92 टक्के पाणीसाठा उरला आहे,
तर राखीव पाणीसाठा मिळून मुंबईसाठी फक्त 12.73 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस मुंबईतील धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यास पाणी कपातीसंदर्भात मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे.





