महत्वाची बातमी ! अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई ; रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरु

Anil Parab Resort । शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. त्यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर आता कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आलीय. बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. या प्रकरणी अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याविरोधात दापोली पोलिस स्टेशनमध्ये 14 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन Anil Parab Resort ।
दापोलीमधील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांचे ‘साई रिसॉर्ट ‘हॉटेल आहे. या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट बांधताना २०० मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. समुद्र गिळंकृत केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
रिसॉर्टचा प्रश्न किरीट सोमय्या यांनी लावून धरला होता. या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करुन गुन्हेगारी कृत्य केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यासंदर्भात तक्रारही केली होती. अखेर या रिसॉर्टचे बांधकाम पाडण्यास सुरुवात झालीय. यासंदर्भातील टि्वट सोमय्या यांनीच केलंय.
सोमवारी सोमय्या गेले होते रत्नागिरीत Anil Parab Resort ।
अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी, यासाठी किरीट सोमय्या सोमवारी रत्नागिरीत गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय मांडला. तसेच सीआरझेड कायदा उल्लंघनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. सोमय्या यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले होते की, “कोणावरही सरसकट कारवाई होणार नाही. मात्र ज्याचेअनधिकृत बांधकाम आहे. त्यावर कारवाई नक्की होणार आहे. अनिल परब आणि सदानंद कदम गावकऱ्यांना पुढे करून भावना भडकवण्याचा काम करत असतील तर त्यांना यश मिळणार नाही.”असे त्यांनी म्हटले होते.
दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम करताना केवळ सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले नाही तर मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला होता. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकला गेला. त्यासाठी अधिकाऱ्यांना अवैध परवानगी देण्यास भाग पाडले, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.





