Lok Sabha Election : दिल्लीत भाजपची महत्वपूर्ण बैठक; शेवटच्या टप्प्यासाठी विशेष रणनिती तयार

Lok Sabha Election 2024 – आता पर्यंतच्या पाच टप्प्यात देशभरात कमी प्रमाणात मतदान झाल्याने शेवटच्या दोन टप्प्यात मतदारांना जागृत करण्यासाठी भाजपने विशेष रणनीती तयार केली आहे. यासाठी सोमवारी भाजप मुख्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष, राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग, तरुण चुग, पक्षाचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय, राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनिल बलूनी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची नवी दिल्लीतील मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीला सरचिटणीसांव्यतिरिक्त इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीतील पक्षाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा सोमवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.





