पुणे | मानवी साखळीतून हृदयाचे महत्व

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जागतिक हृदय दिनानिमित्त मानवी शरीरातील हृदयाचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावे, या उद्देशाने नऱ्हे येथील उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिर्नींनी मानवी साखळीतून हृदय साकारले.
हृदयाचे कार्य कशा प्रकारे होते, त्याची काळजी कशी घ्यायला हवी, याविषयी या वेळी मार्गदर्शन करण्यात आले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांच्यासह नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य शीतल निकम व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, की जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे.
असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवा प्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत. त्यासंबंधी जनजागृती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


