पुणे जिल्हा | धनगर आरक्षण अंमलबजावणी करा

बारामती, (प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाबाबत अनेक मोर्चे ,आंदोलने सुरू आहेत. यासाठी सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी क्रांती शौर्य सेनेच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना निवेदन देण्यात आले.
संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी त्यांनी हे निवेदन स्वीकारले. अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयास मेल करण्यात आली.
बारामती येथील शासकीय विश्रामगृह येथे डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन वाघमोडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दलही अभिनंदन केले.
यावेळी वाघमोडे यांनी दुसरे संविधानिक पदावर असणारे आदिवासी नेते पक्षपाती भूमिका घेत वंचित असणाऱ्या धनगर समाजावर अन्याय करीत आहेत. अशी तक्रार त्यांनी केली.
बिहार, ओरिसा, झारखंड या राज्यात धनगर जमातीचा स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करून अनुसूचित जमातीमध्ये दि. ८ जानेवारी २००३ मध्ये अंमलबजावणी करण्यात आली, हे उल्लेखनीय आहे.
अनुसूचित जाती आणि जमाती आदेश अधिनियम, १९७६ अधिनियम क्रमांक १०८ नुसार क्रमांक ३६ वर धनगड शब्द नोंदवला. परंतु उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड यांचे हायकोर्ट निर्णयानुसार धनगर शब्द करेक्ट आहे,
धनगड शब्द चुकीचा आहे. यावेळी संग्राम मारकड, धनराज कोकरे, डॉ. सुजित वाघमोडे, राजेंद्र देवकर, सूरज माने, आशुतोष पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.





