वॉशिंग्टन – गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यानंतर सोशल मीडियाही प्रभावशाली झाला सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मच्या आधारे डिजिटल पद्धतीने मैत्री करण्याचेही प्रकार सुरू झाले पण आता एका नवीन संशोधनाप्रमाणे सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मच्या आधारे करण्यात आलेल्या मैत्रीमुळे नकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर करण्यात येणारी मैत्री ही लाईक किंवा कॉमेंटच्या आधारे करण्यात येत असल्याने हा माध्यम वापरणाऱ्याच्या मनात ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. सोशल मीडियावर एखादा विचार व्यक्त केल्यानंतर या विचारांना पाठिंबा दर्शवणाऱ्याना मित्र समजले जाते आणि विरोध करणाऱ्यांना शत्रू समजण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्यातून हे ताण तणाव निर्माण होत आहेत हारवर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनने प्रोजेक्ट झिरो या नावाखाली या विषयावर एक संशोधन केले असून त्यामध्ये 50 टक्के तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या वापरामुळे मानसिक ताण तणाव निर्माण झाले असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील मैत्रीबाबत ताण घेणाऱ्यांमध्ये मुलींपेक्षाही मुलांचे प्रमाण जास्त आहे. सोशल मीडियावरील मैत्री फक्त लाईक आणि कमेंटच्या आधारे होत असल्यामुळे अनेक वेळा ज्या व्यक्तींना किंवा लोकांना आपण ओळखत नाही त्यांना सुद्धा लाईक करून मैत्रीचे रिक्वेस्ट पाठवली जात असल्यामुळे त्यातूनही काही धोके निर्माण होतील होऊ शकतात असा इशारा या संशोधनानंतर देण्यात आला आहे या डिजिटल मैत्रीमुळे जर मुले ताणतणावाखाली आली असतील तर पालकांनी त्यांच्याशी बोलून त्यांना मैत्री म्हणजे नक्की काय हे सांगण्याची गरज असल्याचे या तज्ञांनी सुचवलेले आहे या डिजिटल पद्धतीने मैत्री करण्याबरोबरच प्रत्येक मुलाने वास्तव जगातील मित्रही तयार करावेत असेही सुचवण्यात आले आहे पालकांनी सर्वप्रथम आपल्या मुलाशी मैत्री जर केली तर तो आपोआपच इतर लोकांशी मैत्री करण्याबाबत विचार सुरू करू शकतो असेही सुचविण्यात आले आहे.