Imp News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ‘या’ कालावधीत ट्रॅफिक ब्लॉक

पिंपरी (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ मुंबई दिशेने ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने शुक्रवारी (दि. 26) करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर आज शुक्रवारी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
दुपारी 12 ते सायंकाळी 4 या कालावधीत वाहतूक किवळे ते देहुरोड मार्ग, (राष्ट्रीय महामार्ग) सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.
या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई – पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर कृपया संपर्क साधावा, असे अवाहन करण्यात आले आहे.





