भीमसेन महाराज व माता कुंती मूर्तीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

Updated On:

उंब्रज – उंब्रज (ता. कराड) येथील मानाचा समजला जाणार्‍या व सुमारे एक महिना चाललेल्या भीम – कुंती सोहळ्याचा आज भीम – कुंती मूर्तीचे विसर्जन हजारो भाविकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार धार्मिक पद्धतीने ‘भीमसेन महाराज की जय’ ‘कुंती माता की जय ‘या जयघोषात पुत्र भीम व माता कुंती यांच्या मूर्तीचे मंगळवारी (दि. १३) रोजी बाराच्या सुमारास विधीवत कृष्णा नदीपात्रात घाटावर मोठया भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. येथील भीम कुंती उत्सवाला शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. श्रावणातील शेवटचा सोमवार हा या उत्सवाचा मुख्य दिवस असतो.

सोमवार (दि.२२) ऑगस्ट रोजी भीमसेन व कुंती माता यांच्या भेटीचा अनोखा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. सोहळयानंतर भीम कुंती मंडपात भाविक दर्शनासाठी येत होते. परंपरेनुसार भाद्रपद पोर्णिमेनंतर भीमसेन महाराज व कुंती माता यांच्या विसर्जनाची तयारी सुरू होती. सोमवार (दि. १२) रोजी सायंकाळी भीमसेन महाराज व माता कुंती यांच्या मूर्तीचे मंडपात पूजन करून भीमसेन मंडळाने गाड्यावरील भीमसेन मूर्ती व्यवस्थित बांधून भाविकांच्या मदतीने मूर्ती असेलला गाडा ओढण्यास सुरूवात केली.

हा गाडा ओढत मुख्य रस्त्यावरील मंडपापर्यंत (ज्याला स्थानिक लोक दिल्ली दरवाजा असे म्हणतात) आणून तिथे दोन्ही मूर्ती एकत्र ठेवण्यात आल्या. भीम-कुंती मंडपात आल्यानंतर भाविकांची दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झाली. यावेळी ग्रामस्थ, भाविक नवसपूर्ती करण्यासाठी नारळाचे तोरण अर्पण करून मनोभावे दर्शन घेत होते. यावेळी भजन, कीर्तन असा कार्यक्रम आयोजित केला होता.
मंगळवारी (दि. १३) रोजी सकाळी भीमसेन महाराज व माता कुंती यांच्या मूर्ती वाजतगाजत भीमसेन मंडपातून ओढत कृष्णा नदीच्या तीरावर आणण्यात आल्या. तिथे आरती करून प्रथम माता कुंतीचे नंतर पुत्र भीमसेन यांच्या मूर्तीचे दुपारी विसर्जन करण्यात आले.

शक्तीचे प्रतीक

शक्तीचे प्रतीक असलेल्या भीमसेन महाराज मूर्ती ही काळ्या मातीची अंदाजे दीड टन वजनाची असते व ती एका लाकडी गाड्यावर असते. हा गाडा ओढण्यात एक वेगळाच अनुभव आहे, असे येथील तरुणांचे मत आहे. अनेक अडचणींना एकीने कसे सामोरे जावे याचे उत्तम उदाहरण (अनुभव) यावेळी पाहावयास मिळतो.

जेष्ठांची युक्ती व तरुणांची शक्ती असा सुरेख संगम म्हणजे हा भीमसेन महाराज मूर्तीचा गाडा ओढून नदी तीरावर विसर्जनाला आणणे, प्रथम दिल्ली दरवाजापासून पक्क्या रस्त्यावर गाडा अडवून धरायची कसरत तर महादेव मंदिर ते नदीपात्रापर्यत एक एक इंच ढकलून पुढे जाणे यासाठी करावी लागणारी कसरत हा क्षण खरोखरच पाहण्यासारखा असतो.

आणखी संबंधित बातम्या

वाघोलीत चार ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कार्यान्वित

2024-09-10 19:19:02

वाघोलीत चार ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कार्यान्वित

पुणे: दिमाखदार मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचे विसर्जन; "मयूरपंख" रथ ठरला आकर्षण

2023-09-30 08:03:54

पुणे: दिमाखदार मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचे विसर्जन; "मयूरपंख" रथ ठरला आकर्षण

मुंबईचा मानाचा गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ

2023-09-28 10:42:37

मुंबईचा मानाचा गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ

पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळ गणपतीचे विसर्जन

2022-09-09 19:34:43

पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळ गणपतीचे विसर्जन

मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन

2022-09-09 17:54:22

मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन