मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावरील बाप्पाचे विसर्जन

Devendra Fadnavis | राज्यभरातील गणपती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पुण्यातील मानाच्या पाचही गणपती मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. याशिवाय मंडळांसह घराघरातील गणरायाला देखील निरोप दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी गणपतीची आरती केली.
#WATCH | On #AnantChaturdashi, Maharashtra CM Devendra Fadnavis performs Ganesh aarti at his residence in Mumbai. pic.twitter.com/7zHaiJiWTC
— ANI (@ANI) September 6, 2025
यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यभरात मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने गणपतीचे विसर्जन केले जात आहे. राज्यात कायदा- सुव्यवस्था राखून शांततेत बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन देखील त्यांनी गणेशभक्तांना केले. Devendra Fadnavis |





