“५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेला काल्पनिक अत्याचार…”; ‘छावा’ चित्रपटावरून स्वरा भास्करचे वादग्रस्त विधान

Swara Bhaskar | बॉलीवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देशभरातून कौतुक केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुघल बादशाह औरंगजेबानं त्यांना हालहाल करुन मारलं, याचंही चित्रण ‘छावा’मधून करण्यात आलं आहे. हे पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून अश्रु आल्याशिवाय राहत नाही. याच मुद्दयावरून आता अभिनेत्री स्वरा भास्करने एक वादग्रस्त ट्वीट केले आहे. ज्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
स्वरा भास्करचे ट्वीट
स्वरा भास्करने एक्स अकाउंटवर लिहिले की, “गैरव्यवस्थापनामुळे चेंगराचेंगरीत भयानक मृत्यू होतात. या भयावह मृत्यूनंतर बुलडोझरने मृतदेह उचलले गेले. अशा परिस्थितीत, त्या गोष्टीवर चिंता व्यक्त न करता ५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेला काल्पनिक अत्याचार पाहून संताप व्यक्त करतोय. तो समाज बुद्धीनं आणि आत्म्याने मृत पावलेला समाज आहे.” ट्वीटमध्ये स्वराने ‘छावा’ चित्रपट आणि प्रयागराजमधील चेंगराचेंगरी यांचा संबंध एकमेकांशी जोडून निशाणा साधला आहे. सध्या स्वरा भास्करचे हे ट्ववीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या विधानावर संताप व्यक्त केला आहे. Swara Bhaskar |
A society that is more enraged at the heavily embellished partly fictionalised filmy torture of Hindus from 500 years ago than they are at the horrendous death by stampede & mismanagement + then alleged JCB bulldozer handling of corpses – is a brain & soul-dead society. #IYKYK
— Swara Bhasker (@ReallySwara) February 18, 2025
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी हजेरी लावली होती. या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. अचानक घडलेल्या या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिकांनी जीव गमावल्याचं समोर आलं आहे. नेमकं याच मुद्द्यावरुन स्वरा भास्करने केलेल्या टवीट्ने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Swara Bhaskar |
दरम्यान, लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलसोबतच अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. Swara Bhaskar |
हेही वाचा:
अरे बापरे! १-२ लाख नाही तर तब्बल ९ लाख लाडक्या बहिणी ठरल्या ‘अपात्र’ ; दरमहा मिळणार हफ्ता होणार बंद





