“मी नार्को टेस्टला तयार, पण…”; अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना आव्हान

Ajit Pawar Vs Anjali Damania| पुणे पोर्शे कार अपघाताप्रकरणी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. तसेच अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली होती. यानंतर आता अंजली दमानिया यांचे हे आव्हान अजित पवार यांनी स्वीकारले आहे आणि त्यांना अजित पवार यांनी प्रतिआव्हान दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार? Ajit Pawar Vs Anjali Damania|
“मी नार्को टेस्टला तयार आहे मात्र त्यातून मी क्लिअर निघालो तर अंजली दमानियांची पुन्हा माध्यमांसमोर यायचं नाही. अंजली दमानियांनी संन्यास घ्यायचा,” असे प्रतिआव्हान अजित पवारांनी दिले.
अजित पवार यांचे चॅलेंज अंजली दमानिया यांनीही स्वीकारले आहे. “अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फोन केला नाही, तर जसे अजित पवार म्हणाले तसे मी गप्प घरी बसव आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा हे मी पूर्णपणे मान्य करेन. कधी करणार नार्को टेस्ट ते लवकरात लवकर कळवा,” असं अंजली दमानिया म्हणाल्या. Ajit Pawar Vs Anjali Damania|
चैलेंज मंजुर आहे ।
अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फ़ोन केला नाही, तर जसे अजित पवार म्हणाले,की
“मी गप्प घरी बसव आणि सार्वजनिक… pic.twitter.com/mfa2aPcdHu
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 29, 2024
अंजली दमानिया यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप
दरम्यान, पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा आरोप अंजली दमानियांनी केला. अजित पवारांनी फोन केला असेल तर तातडीने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी अंजली दमानियांनी केली. त्यावर आपण कोणालाही फोन केला नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केला. Ajit Pawar Vs Anjali Damania|
“पुण्याच्या भीषण अपघातात 2 तरुणांचा बळी गेला. एका श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्याच्या मागे कोण आहे? अशी शंका माझ्या मनात होती. प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार या प्रकरणात पहिल्या 4 दिवसांत काहीही बोलले नाही. मी सकाळी उठून काम करतो म्हणणाऱ्या दादांनी या प्रकरणात चकार शब्दही काढला नाही. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेंचे नाव येत होते. पण ही सारवासारव कुणासाठी चालली होती? या प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट झाली पाहिजे,” असे दमानिया म्हणाल्या होत्या. Ajit Pawar Vs Anjali Damania|
हेही वाचा:
प्रज्वल रेवन्नाला आज भारतात बेंगळुरू विमानतळावर येताच होणार ‘अटक’, पोलिसांचा इशारा





