मी आता फक्त केंद्रातून आदेश येण्याची वाट पाहतोय

संघाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर येडियुरप्पांचे वक्तव्य
बंगळुरू : कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपचे ज्येष्ट नेता आणि माजी मुख्यमंत्री यांनी आज संघाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीनंतर त्यांनी आता आपण फक्त केंद्रातून आदेश येण्याची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, केंद्राने आदेश दिल्यानंतर लगेच आम्ही विधीमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची तयारी करू असेही येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.
कर्नाटकात मंगळवारी सत्तासंघर्षाचा शेवट झाला. त्यामुळे आता नव्या सरकारच्या स्थापनेसाठी भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, येडियुरप्पाच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे सांगण्यात आले आहे. राज्यातील या राजकिय नाट्यावर सर्वच राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकात लालसेचा विजय झाला असल्याचे म्हटले तर कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही याची जाणीव भाजपला एकदिवस होणार असेह म्हटले आहे. तिकडे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनीदेखील आपल्या आमदारावर कारवाई करत आमदार एन महेशकुमार यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.





