ILT20 Wildcard Players : आंद्रे रसेल नाइट रायडर्स संघात परतला; किरॉन पोलार्डसह सहा स्टार खेळाडूंना मिळाली वाइल्डकार्ड एन्ट्री
ILT20 Wildcard Players : आयएलटी२० च्या पाचव्या हंगामासाठी ६ फ्रँचायझींनी त्यांच्या वाइल्डकार्ड खेळाडूंची घोषणा केली आहे. आंद्रे रसेल अबू धाबी नाइट रायडर्समध्ये सामील होईल, टीम सेफर्ट शारजाह वॉरियर्समध्ये सामील होईल आणि अकील हुसेन गल्फ जायंट्समध्ये सामील होईल.

ILT20 Season 5 Wildcard Players Andre Russell Kieron Pollard Sam Billings Tom Curran : जगभरातील टी-२० लीगमध्ये आपल्या स्फोटक खेळाने दहशत निर्माण करणारे दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा एकदा आयएलटी-२० (ILT20) च्या पाचव्या हंगामात धमाल उडवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत शारजाह, दुबई आणि अबू धाबी येथील मैदानांवर रंगणाऱ्या या रोमांचक स्पर्धेपूर्वी सर्व सहा फ्रँचायझींनी आपापल्या वाइल्डकार्ड खेळाडूंची अधिकृत घोषणा केली असून, यामध्ये अनेक मोठ्या जागतिक क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
अबू धाबी नाइट रायडर्समध्ये आंद्रे रसेलचे दमदार पुनरागमन –
वेस्ट इंडिजचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल पुन्हा एकदा अबू धाबी नाइट रायडर्सच्या जर्सीत मैदानावर उतरणार आहे. या फ्रँचायझीसाठी आजवर ३८ सामने खेळलेल्या रसेलने २०२५ मध्ये १५७ धावांसह १० विकेट्स घेतले होते; मात्र २०२६ मध्ये त्याला केवळ दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली होती. दुसरीकडे, न्यूझीलंडचा स्फोटक यष्टिरक्षक फलंदाज टिम सेफर्ट पुन्हा शारजाह वॉरियर्सकडून खेळताना दिसेल, ज्याने २०२५ च्या एलिमिनेटरमध्ये २० चेंडूंत ४० धावांची वादळी खेळी साकारली होती.
सॅम बिलिंग्सकडे पुन्हा एकदा दुबई कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा –
Russell, Tom Curran, Billings, Hosein, Pollard and Seifert bolster DP World ILT20 Season 5 squads as wildcards
Read more: https://t.co/WSXBzczvN7 https://t.co/OL8vyq14ye
— International League T20 (@ILT20Official) November 16, 2026
इंग्लंडचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्स पाचव्या हंगामातही दुबई कॅपिटल्सचे यशस्वी नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे. बिलिंग्सच्याच प्रभावी कर्णधारपदाखाली दुबई कॅपिटल्सने २०२५ मध्ये पहिल्यांदाच आयएलटी-२० चे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे, पहिल्या हंगामात डेझर्ट वायपर्सकडून खेळलेल्या बिलिंग्सच्या नावावर या लीगच्या सुरुवातीच्या तिन्ही हंगामांचे अंतिम सामने खेळण्याचा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.
अकील हुसेनच्या समावेशामुळे गल्फ जायंट्सची गोलंदाजी होणार अधिक धारदार
Arabian Aces needed 18 runs off the last 12 balls to win against United Tigers—and then came the Andre Russell show! 💜🔥
Dre Russ vs Faheem Ashraf in 9th Over: (Wd, 4️⃣,4️⃣,6️⃣,0,4️⃣)
– 22* Runs | 9 Balls
– 3 Fours | 1 Six
– 244 Strike Rate https://t.co/lQPZGaL6cV— Knight Club : KKR (@KnightClub_KKR) November 16, 2026
डावखुरा फिरकीपटू अकील हुसेनला गल्फ जायंट्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. यापूर्वी अबू धाबी नाइट रायडर्स आणि एमआय एमिरेट्सकडून खेळलेल्या हुसेनला आता गल्फ जायंट्समध्ये वेस्ट इंडिजचेच वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ आणि शामर जोसेफ तसेच फलंदाज एलिक अथानाजे यांची भक्कम साथ मिळणार असल्याने संघाची ताकद अनेक पटींनी वाढली आहे.
टॉम करनची डेझर्ट वायपर्समध्ये घरवापसी, तर पोलार्ड एमआय एमिरेट्ससोबत कायम –
इंग्लंडचा अष्टपैलू टॉम करन पहिल्या हंगामातील उपविजेत्या डेझर्ट वायपर्स संघात पुन्हा परतला असून, दुसऱ्या हंगामात तो गल्फ जायंट्सकडून खेळला होता. दुसरीकडे, लीगच्या पहिल्या हंगामापासूनच एमआय एमिरेट्सशी जोडलेला आणि २०२४ चा विजेता तथा दोनदा कर्णधार राहिलेला कायरन पोलार्ड पुन्हा एकदा वाइल्डकार्ड खेळाडू म्हणून या संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.





