Nagar : अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला
Updated On:

शेवगाव : शेवगाव तहसीलदारांच्या पथकाने आज एका हायवाला चार ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना पकडले.
ही कारवाई तहसीलदार प्रशांत सांगडे, दहिगाव मंडळ अधिकारी सोनाली दहिफळे, तलाठी ब्राह्मणे, महसूल सहाय्यक सुरेश बर्डे, संजय उपळकर यांच्या पथकाने केली.
रामदास वसंत थोरात यांचा एम.एस १६ डि. के ९२९२ या नंबरचा हायवा अवैधपणे वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करत होता.
तहसीलदारांच्या पथकाने चालक भारत काळे व हायवाला ताब्यात घेतले. या प्रकरणी संबंधित मालक व चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.





