#IPL : लोकेश राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कर्णधारपदी

नवी दिल्ली : सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल यांची किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आयपीएलमधील आगामी मोसमात कर्णधारपदी निवड केली आहे. पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी ही माहिती दिली आहे.
कुंबळे पुढे बोलताना म्हणाले की, ” ही राहुलच्या कारकिर्दीतील योग्य वेळ असून कर्णधारपदाची धूरा संभाळताना त्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील आणि त्याला याचा फायदाच होईल.”
राहुलने यानंतर ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. राहुलने म्हटले आहे की, ” मला ही जबाबदारी दिल्याबदल मी माझ्या प्रशिक्षक, फ्रँचाइझी, सहकारी तसेच सर्व चाहत्यांना धन्यवाद देतो.
तसेच त्यांनी मला समर्थन दिलं त्याबदल आभार मानतो. लिलावात आमचा दिवस चांगला होता, आम्हाला जे खेळाडू हवे होते ते आम्ही खरेदी केले. आता आयपीएल सुरू होण्याची वाट पाहत आहे.”
Rahul… naam toh suna hoga? 😉
Hun captaincy vi vekhoge! Here's welcoming our new skippah – @klrahul11 😍#SaddaPunjab #CaptainPunjab pic.twitter.com/LRRqj7HhjK
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) December 19, 2019
मागील दोन मोसमात रविचंद्रन अश्विन याने पंजाब संघाचे कर्णधारपद संभाळले होते. यंदाच्या मोसमात अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मागील मोसमात राहुलने सर्वाधिक धावां करण्याच्या क्रमवारीत दुस-या स्थानी होता.
त्याने १४ सामन्यात ५३.९० च्या सरासरीने ५९३ धावा काढल्या होत्या. यामध्ये १ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश होता. सध्या राहुल चागल्या फाॅर्मात आहे, त्यामुळे यंदा कर्णधारपदाची धूरा सांभाळताना राहुल कशी कामगिरी करणार यांची सर्वानांच उत्सुकता लागली आहे.





