“तुला वेगळे राहायचे तर राहा…”; लग्नाआधी सोनाक्षीने पती झहीरला स्पष्टच सांगितले

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोनाक्षी पती जहीर इक्बालसोबतचे मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तसेच दोघे अनेकदा एकत्र फिरायलाही जातात. त्यांच्या लग्नाला दीड वर्ष झाले आहे. यानंतर आता तिने झहीरच्या कुटूंबाबत पहिल्यांदा एका मुलाखतीत भाष्य केले आहे.
सोनाक्षी सिन्हा कॉमेडियन भारती सिंहच्या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी सोनाक्षी सिन्हाने म्हटले की, “आम्ही एकत्र सुट्टी घालवण्यास जातो आणि सर्वजण मस्त मजा करतो. मला लग्नाच्या अगोदरच झहीरने विचारले होते की, तुला वेगळे राहायचे आहे का? मी त्यावेळी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. मी त्याला म्हटले की, मी तुझ्या कुटुंबियांसोबत राहिल. तुला वेगळे राहायचे तर राहा.”
सोनाक्षी व तिच्या सासूबाईंना स्वयंपाक करता येत नाही. त्याबाबत तिने सांगितले की, “मला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. माझी आई खूप छान स्वयंपाक करते, पण तिला खटकणारी एकमेव गोष्ट म्हणजे मला स्वयंपाकच येत नाही. माझ्या सासूलाही स्वयंपाक येत नाही. त्यामुळे त्या म्हणतात की तुझं लग्न योग्य घरात झालंय. मला जेवायला आवडतं, जेवण बनवायला नाही.” Sonakshi Sinha And Zaheer Iqbal |
सोनाक्षी सिन्हाने 2024 मध्ये झहीर इक्बालसोबत रजिस्टर मॅरेज केले. सोनाक्षीने सात वर्ष डेट केल्यानंतर झहीर इक्बालसोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी मुंबईत धमाकेदार पार्टी सुद्धा केली. Sonakshi Sinha And Zaheer Iqbal |
हेही वाचा:





