ट्रेन प्रवासादरम्यान हेक्टिक टाळायचं असेल तर ‘हे’ सरकारी ऍप आहे फायदेशीर ! ट्रेनच्या लोकेशनपर्यंत सर्व अपडेट मिळतील

Train App : धुके आणि ट्रॅकवर सुरू असलेल्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत असून अनेकांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. अनेक गाड्या ज्या स्थानकांवर याआधी थांबा होत्या त्या स्थानकांवर थांबत नाहीत. अशा परिस्थितीत ज्यांनी आधीच तिकीट काढले आहे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रेन कुठून पकडून प्रवास सुरू करायचा, या चिंतेत आहेत.
where is my train या ऍप चा वापर अनेक जण करतात. परंतु कधीकधी या ऍपवरही योग्य माहिती उपलब्ध होत नाही. म्हणूनच यावर उपाय म्हणून आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला ट्रेन प्रवास करताना मदत तर होईलच शिवाय ट्रेन नेमकी कोठे आहे हे देखील समजेल.
पहिला पर्याय – 139
जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर त्यापूर्वी 139 वर कॉल करा. त्यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि तुम्ही ज्या स्थानकावरून प्रवास सुरू करणार आहात त्या स्थानकावर ही ट्रेन थांबेल की नाही ते तपासा.
दुसरी पर्याय – रेल्वे चौकशी
तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी, कृपया https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ ला भेट देऊन तुमची ट्रेन शोधा. जर ही साइट तुम्हाला सांगते की ही ट्रेन एखाद्या विशिष्ट स्थानकावर रद्द झाली आहे, तर याचा अर्थ असा आहे की ही ट्रेन तिथे जाईल परंतु थांबणार नाही. या साइटवर तुम्ही ट्रेनचा नंबर आणि स्टेशनचे नाव घेऊन माहिती मिळवू शकता.
तिसरी पर्याय – रेल्वे चौकशी ऍप
तिसरा मार्ग म्हणजे Google Play Store किंवा Apple App Store वरून तुमच्या फोनवर National Train Inquiry System ऍप डाउनलोड करणे. या ऍपच्या मदतीने तुम्ही तुमच्या ट्रेनचे लाईव्ह लोकेशन, कोणत्याही स्थानकावर थांबणे, रद्द करणे इत्यादी माहिती मिळवू शकाल. कोणत्याही ट्रेनचे वेळापत्रक री-शेड्युल केले असल्यास, त्याची माहितीही तुम्हाला या ऍपवर मिळेल.




