“तुम्ही निर्णय मागे घेत नसाल, तर आम्ही राजीनामे देऊ”; शरद पवारांच्या निवृत्तीच्या भूमिकेनंतर कार्यकर्ते भावुक!

Updated On:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. कुठे थांबायचं हे मला माहिती आहे, असे म्हणत अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचे शरद पवारांनी यावेळी जाहीर केले आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबतच यावेळी सभागृहात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

शरद पवारांच्या या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी, ‘शरद पवार जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही’, अशी भूमिका घेतली. यावर बोलताना अजित पवारांनी पक्षाची कमिटी जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे शरद पवारांनी सांगितल्याचे जाहीर केले आहे.

शरद पवारांनी आज लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी केलेल्या भाषणाच्या शेवटी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे.

काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. त्यानंतर आता शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केल्यामुळे हे विधान त्यांच्याच बाबतीत होतं का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी