Raosaheb Danve | राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज 12 जुलै रोजी होणार्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्हीसमोर मतांची जुळवाजुळव करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान दोहोंकडच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. आज सकाळी ९ ते ४ या वेळेत विधानभवन परिसरात मतदान होणार आहे. त्यानंतर पाच वाजता मतमोजणी होणार आहे. मात्र भाजप विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले रावसाहेब दानवे? विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. पण राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट असे आमचे सर्वांचे आमदार एकत्र आहेत. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार 100 टक्के वियजी होतील. राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार, कारण विरोधकांकडून तो होऊ शकत नाही”, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. ‘मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय होऊ नये’ यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात देखील भाष्य केले. “मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय होऊ नये. सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र बसून यावर मार्ग शोधला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने आता १० टक्के आरक्षण दिले आहे. यावरही समाजाचे समाधान झालं नसेल तर यावर काय मार्ग निघू शकतो? यासाठी महायुती सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते.” “तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन ते प्रश्न सोडवले पाहिजेत. पण दोन दिवसांपूर्वी जी बैठक पार पडली, त्या बैठकीला विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. याचा अर्थ त्यांना हे आरक्षण देण्यासंदर्भात आस्था नाही. पण आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत”, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी चार किंवा जास्त मतांची गरज भासणार आहे, असे दिसते. तर महायुतीला आपला नववा उमेदवार निवडून आणण्यासाठी सहा मतांची गरज भासणार आहे. या मतांची जुळवाजवळ नेमकी कशी होणार? यात अपक्ष आमदारांचे महत्त्व किती? कोण पडद्याआडून मतदान करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात नुकत्याच फुटलेल्या पक्षातील आमदार कुणाच्या बाजूने निर्णय घेणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे. Raosaheb Danve | महायुतीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट ), शिवसेना (शिंदे गट) प्रामुख्याने हे तीन राजकीय पक्ष आहेत. यात राष्ट्रवादी (अजित पवार)- 41, भाजपा- 103, शिवसेना शिंदे गट- 38 असे संख्याबळ आहे. तसेच महायुतीला देवेंद्र भुयार, संजय शिंदे या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला मानणारे आमदार पाठिंबा देण्याची शक्यता आहे. असे अजित पवार राष्ट्रवादीचे एकूण 43 आमदार महायुतीला पाठिंबा देतील. तसेच भाजपला रवी राणा, महेश बालदी, विनोद अग्रवाल, प्रकाश आवाडे, राजेंद्र राऊत, विनय कोरे, रत्नाकर गुट्टे हे आमदार पाठिंबा देणार आहेत, असा अंदाज आहे. Raosaheb Danve | हेही वाचा: शेतकऱ्यांना फेल झालेले विद्युत रोहीत्र मिळेणा.. शेतकरी चिंतेत..