शेतकऱ्यांना फेल झालेले विद्युत रोहीत्र मिळेणा.. शेतकरी चिंतेत..

अरूणकुमार मोटे
शिरूर – शिरूर तालुक्यात फेल झालेले विद्युत रोही त्र महीनोनमहिने मिळत नसल्याने परीसरातील शेतकरी मेटाकुटीला आले असून राजकीय पुढाऱ्यांनी लक्ष घालून फेल झालेले विद्युत रोहीत्र तातडीने बसवून दयावे .नाहीतर जनता राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असे शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते नितीन थोरात, मनसेने अविनाश घोगरे, दिपक रत्नपारखी, बाळासाहेब डांगे, प्रकाश भाकरे जयवंत भाकरे यांनी सांगितले आहे .
शिरूरच्या बेट भागात चोरी झालेले, फेल झालेले विदयुत रोहीत्र सहा सहा महिने मिळत नाही.मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांनी शेतमालाला पाणी कसे दयायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहीला आहे. विद्युत रोहीत्र वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे.
शिरूर तालुक्यातील किती विद्युत रोहीत्र फेल झाले ?कीती चोरीला गेले ? ते किती दिवसात बसले .उशिरा बसल्यामुळे शेतकऱ्यांचा किती तोटा झाला याची राजकीय पुढाऱ्यांनी शहानिशा करणे गरजेचे आहे. शिरूर तालुक्यात केडगाव विभागाकडून विदयुत रोहीत्र देण्यासाठी दुजाभाव करत असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहे. मग राजकीय पुढारी करतात तरी काय हा प्रश्न ऊपस्थित होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचे तीव्र प्रतिसाद उमटल्याशिवाय राहणार नाही हे नक्की..





