‘साहेबांनी आदेश दिला तर, मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो’

Raj Thackeray । महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याच्या दृष्टीने मोठी पावलं उचलत असल्याचे दिसत आहे.
आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी मनसेकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या भेटीवरून चर्चा अशीही आहे की, दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे.
दक्षिण मुंबईतून तिकट देण्याच्या चर्चानावर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले ,’मी याआधी दोनदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आता (राज ठाकरे) साहेबांनी सांगितलं तर, ‘मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो. आम्हाला कानावर आदेश पडला की त्यानुसार कृती करण्याची सवय आहे. त्यामुळे राज ठाकरे जो आदेश देतील, त्यानुसार निर्णय घेऊ. मी उद्या पुन्हा राजसाहेबांसोबत चर्चा करणार आहे,” असं नांदगावकर यांनी सांगितलं आहे.
हे वाचाल का ? यूपीमध्ये भाजप नव्याचेहऱ्यांना देणार ‘संधी’; कुमार विश्वाससह ‘या’ नावांची चर्चा





