रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास असे काही असतील परिणाम

नवी दिल्ली – रशिया-युक्रेन या दोन्ही देशामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी जगभरातील देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. रशियाने हल्ला केल्यास युक्रेनच्या बाजूने अमेरिका उभी राहणार असल्याचे अमेरिकेने सांगितलॆ आहे. त्याशिवाय रशियाविरोधात काही युरोपीयन देशही उतरण्याची शक्यता आहे. या घडामोडींचे पडसाद जागतिक राजकारणावर आणि अर्थकारणावर होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्ध पेटल्यास भारतावरही याचा परिणाम होणार आहे.
भारताची भूमिका काय?
रशिया आणि युक्रेनच्या वादावर भारताने भूमिका घ्यावी असे आवाहन अमेरिकेने केले आहे. युद्ध झाल्यास भारत अमेरिका-युक्रेनच्या बाजूने उतरेल अशी अपेक्षाही अमेरिकेने व्यक्त केली होती. तर, भारताने चर्चेद्वारे वाद सोडवण्याची भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या बाजूने थेटपणे उभं राहणं हे भारताला अडचणीचे ठरू शकते असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
युद्धाचा काय परिणाम होईल?
– युद्धाच्या सावटामुळे जगातील शेअर बाजारात घसरण सुरू
– भारतीय शेअर बाजारातही याचे पडसाद
– इंधन दर वाढणार
– आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली
– प्रति बॅरल 100 डॉलर इतका उच्चांक दर ही गाठला (सध्या प्रति बॅरल 93 डॉलर असा दर सुरू)
– भारताच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम
– रशिया-चीनची जवळीक डोकेदुखी ठरणार





