Army Chief Upendra Dwivedi | लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला पुन्हा इशारा दिला आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथे भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना द्विवेदी यांनी पाकिस्तानला नकाशावर दिसायचे असेल तर दहशतवाद्यांना मदत करणे थांबवावे लागेल, अशा भाषेत थेट खडसावले आहे. उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कठोर इशारा देत म्हटले आहे की, “जर त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले नाही तर ते नकाशावरून पुसले जाऊ शकतात. जर पाकिस्तानने भारतविरोधी कारवाया केल्या तर आम्ही पाकिस्तानला जगाच्या नकाशावर राहायचे आहे की नाही याचा पुनर्विचार करण्यास भाग पाडू. यावेळी भारतीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध कोणताही संयमाची भूमिका घेणार नाही.” “ऑपरेशन सिंदूर १ दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत पाकिस्तानी सैनिक आणि अनेक दहशतवादी मारले गेले होते. पाकिस्तानचा सरकार पुरस्कृत दहशतवाद नष्ट केला पाहिजे. ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवला जाणार नाही. भारतीय जवानांनो पूर्णपणे सज्ज राहा, ईश्वराची इच्छा असेल तर लवकरच संधी येईल,” असेही सूचक विधान द्विवेदी यांनी केले आहे. लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज “पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांचे पुरावे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जगासमोर मांडले. भारताने ही वस्तुस्थिती उघड केली. सीमावर्ती भागात राहणारे लोक हे देखील सैनिकच आहेत. ते लोक सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. देशासमोर उभी राहणारी सर्व आव्हाने पेलण्यास लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय लष्कराचे जवान आणि स्थानिक लोकांना जाते,” असेही ते म्हणाले. Army Chief Upendra Dwivedi | दरम्यान, हवाई दल प्रमुख एपी सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी खुलासा केला आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “पहलगाम हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली. ऑपरेशन सिंदूर इतिहासात लक्षात राहील. आम्ही ३-४ दिवसांत युद्ध पूर्ण केले. युद्ध कसे संपवायचे हे जगाने भारताकडून शिकले पाहिजे. आम्ही पाकिस्तानी हद्दीत २०० किलोमीटर आत मारा केला. आमच्या सैन्याने ४-५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली, ज्यात एकF-16 आणि JF-17 लढाऊ विमानांचा समावेश आहे,” असे सांगितले. Army Chief Upendra Dwivedi | हेही वाचा: अखेर नॅशनल क्रशचं ठरलं! रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने गुपचूप उरकला साखरपुडा; लवकरच लग्नाचीही होणार घोषणा