“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

India Vs Pakistan | भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर रविवारी भारतीय सैन्य, वायुसेना आणि नौदलाच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्सची (DGMO) ११ मे २०२५ रोजी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यात ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानातील 100 हून दहशतवादी आणि 40 सैनिक मारले गेल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. तसेच या दरम्यान भारताचे 5 शूर जवान शहीद झाल्याची माहिती त्यांनी दिली.
काल सायंकाळी ६:३० च्या सुमारास तिन्ही सैन्यदलांनी १ तास १० मिनिटांची पत्रकार परिषद घेत पाकिस्तानने पुन्हा कुरापत केली तर आता सोडलं जाणार नाही, असा इशारा दिला आहे. यावेळी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाईस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एयर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईची माहिती दिली.
भारताच्या तीनही दलाच्या पत्रकार परिषदेत गेल्या तीन दिवसांत काय कारवाई करण्यात आली, याबाबत माहिती देण्यात आली. पाकिस्तानने भारतीय एअरबेस आणि सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट केलं होतं. पण भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतून लावले. तसेच भारताने पाकिस्तानच्या केवळ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं होतं. पण पाकिस्तानने भारतीय एअरबेसवर हल्ला केला. यामुळे भारताने पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला केला. India Vs Pakistan |
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या सरगोदा, रहीमयार खान या एअरबेसचा रनवे उद्ध्वस्त करण्यात आला. भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराच्या पसरूर, चुनियान, आरिफवाला या रडार यंत्रणेला आणि भुलारी, जैककाबाद, चकलाला, रहिमयार, सरगोधा या एअरफील्डला लक्ष्य केले आणि पाकिस्तानी लष्कराचे प्रचंड नुकसान केल्याचे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले. India Vs Pakistan |
‘कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही’
“गेल्या काही दिवसांपासून जे काही सुरू आहे ते कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही. सामान्य परिस्थितीत दोन देशांचे हवाई दल अॅक्शन घेत नाहीत. एकमेकांवर हवाई हल्ले करत नाहीत. रोज रात्री घुसखोरी होत नाही. नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न होतोय. पण आम्हाला माहिती आहे की, घुसखोरी करणारे किंवा भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या टोळ्या देखील असू शकतात.
या सर्व घडामोडी युद्धात सहभागी आहेत. पुढे काय होणार हे सांगणं कठीण आहे. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही”, असा इशारा डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिला.
“भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईत केवळ दहशतवाद्यांची ठिकाणं टार्गेटवर होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मुदस्सर खास, हाफिज जमील आणि युसूफ अझहर या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तसेच बहावलूर आणि मुरीदके दहशतवादी प्रशिक्षण केंद्र देखील आमच्या निशाण्यावर होते. भारताच्या कारवाईत 35 ते 40 सैनिक मारले गेले आहेत. India Vs Pakistan |
जैश-ए-मोहम्मदचा दशतवादी तळ उद्ध्वस्त
ऑपरेशन सिंदूरद्वारे बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ, लाहोरमधील डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली. तर 26/11 हल्ल्यातील दहशतवादी कसाब याने जिथे प्रशिक्षण घेतलं ते मुरीदके तळही उद्ध्वस्त करण्यात आलं. ऑपरेशन सिंधूरमध्ये ९दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली. यातून 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाला,” अशी देखील माहिती DGMO कडून देण्यात आली.
हेही वाचा:
Pune District : नाट्याचे प्रशिक्षण लहान वयात मिळणे कौतुकास्पद -तपकिरे





