‘फिटनेस जीममध्ये नाही तर…’; प्राजक्ताने केदारनाथ दर्शनाचा अनुभव शेअर करताच चाहते नाराज

Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केदारनाथमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. प्राजक्तासोबत अभिनेत्री अमृता खानविलकरनेही केदारनाथचं दर्शन घेतलं. नुकतेच प्राजक्ताने एक व्हिडिओ शेअर करत केदारनाथमधील तिचा अनुभव शेअर केला आहे. मात्र एका कृतीमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केदारनाथ दर्शनाला जाण्यासाठी गौरीकुंडपर्यंत पायी चालत जायचं ठरवल्याचं सांगितलं. पण ते तिला शक्य न झाल्यामुळे पुढे तिला घोड्यावरून प्रवास करावा लागला. यावरून काही चाहत्यांनी कमेंट्समध्ये नाराजी व्यक्त केली.
प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, ‘Behind the Kedarnath Trek…#trekdiaries #केदारनाथ #यात्रा…३६५ दिवसांचा व्यायाम एकीकडे आणि केदारनाथ ट्रेक एकीकडे. खूपच अवघड आणि परिक्षा पाहणारा. संपुर्ण ट्रेक पायी करायला आवडला असता; परंतू आईची तब्येत बिघडली. आईला साथ आणि स्वतःची अपुरी तयारी; यामुळे सगळ्या गोष्टींचा अवलंब करत ट्रेक पुर्ण केला.’ Prajakta Mali |
View this post on Instagram
“(तळटीप- Gym- योग हा व्यायाम वेगळा आणि ट्रेक साठी लागणारा व्यायाम वेगळा. किमान २-३ महिने आधीपासून तयारी करणे आवश्यक) अर्थात; इतर कुठल्याही गोष्टांपेक्षा मनात भाव, श्रद्धा याच गोष्टी महत्त्वाच्या,” असे प्राजक्ताने पोस्टमध्ये लिहिले आहे.
प्राजक्ताने ट्रेकला जाताना पालखी आणि घोड्यांचा वापरककेल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कमेंट्स करत नेटकऱ्यांनी, ‘दुसऱ्या जिवावर बसून भोलेनाथ कसे मिळतील’, ‘तुम्ही दर्शनासाठी पायी जायला पाहिजे होतं’, ‘त्यापेक्षा हॅलीकॉप्टरने जायला हवं होतं’, ‘खरा फिटनेस जीममध्ये नाही तर इथे ठरतो,’ असे म्हंटले आहे. Prajakta Mali |
प्राजक्ता माळी २०२४ मध्ये ‘फुलवंती’ या सिनेमात पाहायला मिळाली. यानंतर आता ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबुम बुम’ या सिनेमात झळकली. Prajakta Mali |
हेही वाचा:
Indapur News : योग ही शारीरिक कसरत नसून ती जीवन जगण्याची शास्त्रीय पद्धत: बाळासाहेब हरणावळ





