Rohit Shrama : ‘जर मी कोच असतो, तर…’, रोहितच्या निवृत्तीवरून रवी शास्त्रींनी गौतम गंभीरवर साधला निशाणा

Ravi Shastri Criticizes Rohit Sharma’s Decision to Skip Sydney Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संपल्यानंतर लगेचच रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीबद्दल चर्चा सुरू झाली होती. त्या मालिकेत टीम इंडियाला १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. संघाने ती मालिका गमावलीच, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्नही भंगले.
रोहितला कधीही असे करू दिले नसते – रवी शास्त्री
रवी शास्त्री यांनी गौतम गंभीरचे नाव न घेता आयसीसी रिव्ह्यूमध्ये सांगितले की, “मी रोहितला नाणेफेक करताना अनेक वेळा पाहिले आहे. नाणेफेकीच्या वेळी तुम्हाला बोलण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. पण, एका सामन्यात मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मला वाटते की तो सामना मुंबईत होता आणि मी त्याला सांगितले होते की, जर मी प्रशिक्षक असतो तर तू शेवटचा कसोटी सामन्यातून बाहेर बसला नसता.
हेही वाचा – Rajat Patidar : ‘मला आरसीबीसाठी खेळायचे नव्हते…’, रजत पाटीदारचा धक्कादायक खुलासा; काय आहे कारण?
तो शेवटचा सामना खेळला असता –
रवी शास्त्री पुढे म्हणाले, तो शेवटचा सामना खेळला असता. कारण मालिका संपली नव्हती. मी असा माणूस नाही जो २-१ च्या स्कोअरवर हार मानतो. जर माझी मानसिकता अशी असती की या स्टेजला जिंकणार नाही, तर मी संघ सोडला असता. कारण तो ३०-४० धावांचा सामना होता आणि मी त्याला हेच सांगितले. सिडनीची खेळपट्टी खूप वेगवान होती. तो कोणत्याही फॉर्ममध्ये असला तरी, तो सामना जिंकून देणारा खेळाडू आहे.
हेही वाचा – Rajat Patidar : ‘मला आरसीबीसाठी खेळायचे नव्हते…’, रजत पाटीदारचा धक्कादायक खुलासा; काय आहे कारण?
जर रोहित फलंदाजीला गेला असता –
शास्त्री पुढे म्हणाले, ‘जर रोहित फलंदाजीला गेला असता, परिस्थिती समजून घेतली असती आणि वरच्या फळीत ३५-४० धावा केल्या असत्या, तर काय झाले असते हे तुम्हाला माहिती नाही. ती मालिका बरोबरीत सुटली असती. पण ती प्रत्येकाची स्वतःची एक शैली असते. इतर लोकांची शैली वेगळी असते. ही माझी शैली होती आणि मी त्याला हे सांगितले. ते माझ्या मनात खूप दिवसांपासून होते आणि मला ते बोलायचे होते. म्हणून मी त्याला हे सांगितले.’





