‘जर गोमांस खाणे योग्य आहे, तर गोमूत्र…”; ‘त्या’ टिकेनंतर भाजप नेत्या तमिलिसाई सुंदरराजन यांचा सवाल

Tamilisai Soundararajan | आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांनी गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांवरील केलेले विधान चांगलेच चर्चेत राहिले. यावरून त्यांच्यावर काहींनी टीका देखील केली होती. यानंतर आता तामिळनाडूच्या माजी भाजप अध्यक्षा तमिलिसाई सुंदरराजन यांनी व्ही. कामकोटी यांचा बचाव केला आहे.
“एक गट म्हणत आहे की ते गोमांस खातील कारण तो त्यांचा अधिकार आहे. मग जेव्हा दुसरा गट रोग बरे करण्यासाठी गोमूत्राचा वापर करतो, तेव्हा ते टिप्पणी का केली जात आहे?”, अशी विचारणा करताना तमिलिसाई सुंदरराजन यांनी ही टीका निराधार असल्याचं म्हटलं आहे.
“आयुर्वेदातही पवित्र द्रव म्हणून गोमूत्राचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचं सेवन केलं जाऊ शकतं. मी अनेक रुग्णांना ते पिताना पाहिलं आहे. तसेच घरासमोर अंगण शेणाने सारवताना त्यातही गोमूत्र टाकण्याची आमची परंपरा आहे. ते एका खताप्रमाणे काम करतं. जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही ते घेऊ नका. पण ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या भावना का दुखावता? तामिळनाडूच्या राजकारणात हीच समस्या आहे,” असंही त्या म्हणाल्या आहेत.
व्ही. कामकोटी काय म्हणाले होते?
कामकोटी १५ जानेवारी २०२५ रोजी मट्टू पोंगलच्या दिवशी गो संरक्षण शाळेत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. तिथे ते देशी गायींचे संरक्षण करणे आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याविषयी बोलत होते. त्याचवेळी त्यांनी गोमूत्र पिऊन ताप दूर केल्याची गोष्ट सांगितली. व्ही. कामकोटी हे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एकदा ते तापानं फणफणत असताना गोमूत्र प्राशन केलं. त्यानंतर ते लगेच बरे झाले. Tamilisai Soundararajan |
तसेच ते म्हणाले, “मोठ्या आतड्यांशी संबंधित आजार इरिटेबल बोवेल सिंड्रोमसारख्या समस्यांवर गोमूत्र उपयुक्त आहे”. कामकोटींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस व द्रमुक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर, भाजपा नेत्यांनी कामकोटींच्या वक्तव्याचे कौतुक केले. आता तमिलिसाई सुंदरराजन यांनी देखील त्यांचा बचाव केला आहे. Tamilisai Soundararajan |
दरम्यान, कामकोटी यांनी 17 जानेवारी 2022 रोजी IIT मद्रासचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला. वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान विकासातील योगदानाबद्दल त्यांना DRDO अकादमी उत्कृष्टता पुरस्कार (2013) यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
हेही वाचा:
Walmik Karad | संतोष देशमुख प्रकरणातील अपडेट समोर; वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी





