Jasprit Bumrah : बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाल्यास ‘या’ 4 गोलंदाजांना मिळू शकते संधी

चॅम्पियन्स ट्रॉफीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला सगळे संघ उत्सुक आहेत तर दुसरीकडे भारतीय संघात टेन्शनचं वातावरण आहे. कारण टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने तो या सिरीजमध्ये खेळेल कि नाही याबाबत साशंकता आहे. त्याची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे मात्र अद्याप तो फिट नाही आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीदरम्यान तो जखमी झाला होता. त्यानंतर तो सामना अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. त्यामुळे त्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही. त्यातुन तो अद्याप फिट होऊ शकला नाही आणि लवकरच न्यूझीलंडमधील डॉक्टरांशी संपर्क साधणार असल्याचे समजत आहे. यानंतर तो स्पर्धेत खेळू शकणार कि नाही हे स्पष्ट होईल. जर बुमराह या स्पर्धेत खेळू शकला नाहीतर तर त्याची जागा कोण घेणार? हा टीमसमोर मोठा प्रश्न आहे.
बुमराहची जागा कोण घेणार?
बुमराह हा जागतिक क्रिकेटमधील आधुनिक बेस्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 32 विकेट घेणारा तो गोलंदाज होता. अशा परिस्थितीत बुमराह भारतीय टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण जर तो पूर्णपणे ठीक झाला नाही तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. भारताचा तो हुकमी एक्का आहे. जर तो फिट न झाल्यास संघ 4 जणांचा विचार करू शकते. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…
1) मोहम्मद सिराज
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली नाही. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.मोहम्मद शमी किंवा जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत सिराजने टीम इंडियाची धुरा सांभाळली. मात्र कामगिरीतील घसरणीमुळे सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संघातून वगळण्यात आले आहे.
2) मुकेश कुमार
मुकेश कुमार हाही गोलंदाज आहे जो जसप्रीत बुमराह बाद झाल्यास संघात सामील होऊ शकतो. त्याने 51 प्रथम श्रेणी सामन्यात 207 विकेट घेतल्या. भारतासाठी, त्याने 6 एकदिवसीय सामन्यात 5 विकेट घेतल्या आणि 17 टी-20 मध्ये 20 विकेट्स घेतल्या. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव लक्षात घेता, भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बुमराहच्या जागी त्याच्या दमाचा म्हणून मुकेश कुमारकडे बघितले जात आहे.
3) प्रसिध कृष्णा
प्रसिध कृष्णा हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. ज्याला खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्याचा उत्तम अनुभव आहे. तो भारताकडून 17 वनडे खेळला आहे. या कालावधीत त्याने 25.58 च्या सरासरीने आणि 5.60 च्या इकॉनॉमीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडे अनुभव आणि वेग आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये जसप्रीत बुमराहची जागा घेणाऱ्या संभाव्य उमेदवारांपैकी प्रसिध कृष्णा एक आहे.
4) हर्षित राणा
ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या वनडे मालिकेत हर्षित राणा भारतीय संघाचा भाग होता. मात्र, 22 वर्षीय खेळाडूला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. दिल्लीच्या या 23 वर्षीय क्रिकेटपटूने आतापर्यंत 14 लिस्ट ए सामने खेळले असून 22 विकेट्स घेतल्या आहेत.तो ऑस्ट्रेलियात दोन कसोटी खेळला. याशिवाय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराहचा बॅकअप म्हणून हर्षित राणाला तयार केले जात आहे.
बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये संघामध्ये या चौघांपैकी एकाला संधी भेटू शकते. त्यामुळे यांच्यापैकी कोणाला संघात स्थान भेटते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





