‘जर १३ वर्षाच्या बालकाला घेऊन आडवाणींनी बाबरी मशीद पाडायला नेलं असलं तर…’ जयंत पाटलांचा घणाघात

मुंबई : अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासंदर्भातील विषयावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलना मध्ये शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असा त्यांनी जाहीर सभेमधून केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांवर घणाघात केला आहे.
माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले,’फडणवीस यांची आणि माझी घट्ट मैत्री आहे. मात्र त्यांनी कधीच मला बाबरी पाडण्यासाठी गेल्याचे कधीही सांगितले नाही. मात्र जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा नक्कीच विचारेल की,’मशीद पाडल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली होती. तशी जबाबदारी फडणवीस घेणार का ?’ जेव्हा ती घटना घडली त्या वेळी फडणवीसांचं वय काय? असेल कदाचित १३ वर्षे मग जर ते बाबरीच्या सहभागात असेल आणि आडवाणींनी बाबरी मशीद पाडायला नेल असल तर आडवाणींनी बालकाचे प्राण धोक्यात घातले म्हणून केस होईल.’असं म्हणत पाटील यांनी फडणवीसांवर घणाघात केला आहे.





