‘आयसीएसई’च्या दहावी, बारावीचा आज निकाल
Updated On:

पुणे – काऊंन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन या बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल दि. 10 जुलै रोजी दुपारी तीन वाजता जाहीर होणार आहे.
“आयसीएसई’ बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा उत्तरपत्रिका तपासणी करून घ्यायची आहे, त्यांनाही अर्ज करता येणार आहे.
संकेतस्थळ : www.cisce.org www.results.cisce.org





