आयसीएसई व आयएससीचा निकाल जाहीर; पुण्यातील शाळांची शंभरी
पुणे – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टीफिकेट एक्झामिनेशन बोर्डाचा दहावी (आयसीएसई) व बारावीचा (आयएससी) निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. या पुण्यातील आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत चांगले यश मिळवले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील या बोर्डाच्या बहुतांश शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे. पुण्याच्या कॅम्पमधील हचिंग्ज स्कूलच्या 191 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 105 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहे. सिमरन बडगुजर या विद्यार्थीनीने 98.2 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. वरद देशपांडे याने 97.8 टक्के गुणांसह दुसरा तर सुब्रज्योती मुखर्जी याने 97.6 टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला आहे. बारावीमध्ये आकाश टॉम हा 90.5 टक्क्यांसह सायन्स शाखेतून शाळेत पहिला आला आहे. ऋतिका शेठ हिने 92 टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
विस्डम स्कूलच्या 59 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. नमन अगरवाल याने 98 टक्क्यांसह शाळेत पहिला तर अनुष्का श्रीवास्तव हिने 97.6 टक्क्यांसह शाळेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. सेंट मेरी ज्युनिअर कॉलेजचा निकालही 100 टक्के लागला आहे. हडपसर येथील पवार पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. परीक्षेला 154 विद्यार्थी बसले होते. आर्या नरके, कृतार्थ देशमुख, रोहित ननवाणे या तिघांनी 98 टक्के गुण मिळवून संयुक्तरित्या शाळेत प्रथम क्रमांक मिळविला.





