Allu Arjun : अॅायकॅान स्टार अल्लू अर्जुनवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीचे निधन; माहिती मिळातच थेट हैद्राबादमध्ये दाखल

Allu Arjun : तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. साऊथचा अॅायकॅान स्टार अल्लू अर्जुनच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. निधनाची बातमी समजातच अल्लू विमानाने मुंबईहून हैद्राबादमध्ये दाखल झाला आहे. अल्लूची आजी कनकरत्नम गरू यांच आज सकाळी वृद्धपकाळाने निधन झांल आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, कनकरत्नम गरू या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्या वयोमानामुळे त्यांना आरोग्यविषयक समस्या भेडसावत होत्या. आज सकाळीच त्यांच्या निधानाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. आज दुपारी त्यांच्यावर कोकापेटमध्ये अंतिम संस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
अल्लू-कोनिडेला कुटुंबातील सर्व सदस्य अल्लू अरविंद यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत. ही माहिती मिळताच अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच अभिनेता राम चरण याने आपल्या पेड्डी या सिनेमाचं शुटिंग थांबवलं असून तोही हैद्राबादमध्ये दाखल झाला आहे.
View this post on Instagram
याशिवाय तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आता कनकरत्नम गरू यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हैद्राबादमध्ये दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते अल्लू रामलिंग यांच्या पत्नी कनकरत्नम गरू या होत्या.
हेही वाचा : “खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स बंद…,आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला का?”; रोहित पवारांचा सवाल





