#IccT20Ranking : कोहलीची टी-२० क्रमवारीत घसरण

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-२० क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर केली. त्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची घसरण झाली आहे. तर, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी स्थान कायम राखले आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली १० व्या स्थानावर आला आहे. कोहलीचे ६७३ गुण असून ९ व्या स्थानावरून १० व्या स्थानी आला आहे. राहुल दुस-या तर रोहित शर्मा ११ व्या स्थानावर कायम आहे.
Eoin Morgan and Tabraiz Shamsi move into the top 10 🚀
All the details from the latest update of the @MRFWorldwide ICC T20I Rankings 👇 https://t.co/sDXGHglK37
— ICC (@ICC) February 17, 2020
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेनंतर आयसीसीने क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडचा कर्णधार इयान माॅर्गन ९ व्या स्थानावर असून पाकिस्तानचा बाबर आझम अव्वलस्थानी आहे. आफ्रिकेचा क्विंटन डी काॅकने क्रमवारीत १६ व्या स्थानी झेप घेतली आहे, तो यापूर्वी २६ व्या स्थानावर होता.





