ICC U19 Women’s T20 World Cup 2025 – भारताच्या १९ वर्षीय फिरकीपटू वैष्णवी शर्माने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात भेदक गोलंदाजी करत नवा इतिहास घडवला आहे. ICC U19 महिला टी२० विश्वचषक २०२५ स्पर्धेत मलेशियाविरुद्धच्या सामन्यात वैष्णवीने अवघ्या ५ धावांत ५ बळी घेत शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे पदार्पणातच हॅटट्रिक घेणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. | Vaishanavi Sharma
वैष्णवीचा दबदबा
डावखुरी फिरकीपटू असलेल्या वैष्णवीने ४ षटकांत केवळ ५ धावा देत मलेशियाच्या फलंदाजीची अक्षरशः धुळधाण केली. १४ व्या षटकात तिने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग तीन फलंदाजांना बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. तिच्या गोलंदाजीसमोर मलेशियाच्या फलंदाजांना डाव सावरणे अशक्य झाले आणि संपूर्ण संघ फक्त ३१ धावांत गारद झाला.
पदार्पणातच विक्रम
पदार्पणातच हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम करून वैष्णवीने इतिहास रचला आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारी ती जगातील मोजक्या गोलंदाजांपैकी एक ठरली असून, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात या विक्रमाने खास स्थान निर्माण केले आहे.
हॅटट्रिक पूर्ण करणारा चेंडू हा माझ्यासाठी खास – वैष्णवी | Vaishanavi Sharma
सामन्यानंतर आपल्या दमदार कामगिरीबद्दल बोलताना वैष्णवी म्हणाली, “मी रवींद्र जाडेजा आणि राधा यादव यांना फॉलो करते. आज मी विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा चांगला फायदा झाला. हॅटट्रिक पूर्ण करणारा चेंडू हा माझ्यासाठी खास होता.”
फलंदाजांची दमदार साथ
भारतीय गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीनंतर फलंदाजांनीही मलेशियाला कोणतीही संधी दिली नाही. ३२ धावांचे लक्ष्य भारतीय सलामीवीरांनी केवळ २.५ षटकांत पूर्ण केले. गोंगाडी त्रिशाने १२ चेंडूत ५ चौकारांसह २७ धावांची नाबाद खेळी करत संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.
भारतीय महिला संघाचा दबदबा | Vaishanavi Sharma
या शानदार विजयासह भारतीय महिला संघाने स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. वैष्णवी शर्माच्या गोलंदाजीची चमक आणि संघाच्या एकत्रित खेळाने भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकत आपली ताकद सिद्ध केली आहे.
वैष्णवी शर्माचे पदार्पण अविस्मरणीय ठरले असून, भविष्यात तिच्याकडून भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याआधीच भारताचा पाकिस्तानला धक्का, जर्सीवर पाकचे नाव छापण्यास स्पष्ट नकार