लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 22 धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. सामन्यानंतर जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले, तर भारताच्या शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांना क्रमवारीत मोठा फटका बसला. जो रूट पुन्हा अव्वल जो रूटने लॉर्ड्स कसोटीतील शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले. त्याने आपला सहकारी हॅरी ब्रूकला मागे टाकत ही कामगिरी केली. ब्रूकने गेल्या आठवड्यात रूटला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले होते, पण त्याला हे स्थान आठवड्यापेक्षा जास्त टिकवता आले नाही. रुटने दोन्ही डावात एकूण 144 धावा केल्या. रुटने पहिल्या डावात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या. रुटने पहिल्या डावात शतक केलं. रुटचं लॉर्ड्समधील हे आठवं तर एकूण 37 वं कसोटी शतक ठरलं. रुटने पहिल्या डावात 104 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात निर्णायक 40 धावा केल्या. 𝑹𝒆𝒕𝒖𝒓𝒏𝒊𝒏𝒈 𝒕𝒐 𝒕𝒉𝒆 𝒔𝒖𝒎𝒎𝒊𝒕 𝒊𝒏 𝒔𝒕𝒚𝒍𝒆 🫡 Joe Root becomes the No. 1 ranked Test batter ⚡ More ➡️ https://t.co/W2lRQdbUMq#WTC27 #ENGvIND pic.twitter.com/CzgOGfLxw3 — ICC (@ICC) July 16, 2025 हॅरी ब्रूकची घसरण हॅरी ब्रूकला भारतीय गोलंदाजांसमोर फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने दोन्ही डावांत मिळून केवळ 34 धावा (पहिल्या डावात 11, दुसऱ्या डावात 23) केल्या. यामुळे त्याची क्रमवारीत दोन स्थानांनी घसरण झाली आणि तो 862 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला. जो रुटच्या खात्यात 888 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन दुसऱ्या स्थानी आहे. केनची रेटिंग 867 इतकी आहे. शुबमन-यशस्वीला फटका भारताचा कर्णधार शुबमन गिल आणि सलामीवीर यशस्वी जयस्वाल यांना लॉर्ड्स कसोटीतील निराशाजनक कामगिरीचा फटका बसला. यशस्वी जयस्वालची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरण झाली. तर चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ आहे. त्यामुळे यशस्वीसमोर टॉप 5 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. दुसरीकडे, शुबमन गिल देखील तीन स्थानांनी घसरून होऊन नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यालादेखील टॉप 10 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतला देखील एका स्थानाचा फटका बसला आहे. त्याची 7 व्या स्थानावरून 8 व्या स्थानी घसरण झाली आहे.