ICC Test Cricket Rankings | अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजा अव्वल
Updated On:

नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने आयसीसीने जाहीर केलेल्या अष्टपैलु क्रिकेटपटूंच्या ताज्या क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जडेजाने गोलंदाजीसह फलंदाजीतही आपली चमक दाखवली. त्यापूर्वीही झालेल्या यंदाच्या मोसमातील सामन्यांत जडेजाने आपली कामगिरी सिद्ध केली आहे.
त्यामुळेच त्याचे क्रमवारीतील स्थान वधारले आहे. या क्रमवारीत जडेजा दुसऱ्या स्थानावर होता, आता त्याने होल्डरला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.





