ICC T20 World Cup | आयसीसीने नेमली करोना समिती
Updated On:

दुबई – करोनाचा धोका कोणत्याही खेळाडूला तसेच सपोर्ट स्टाफमधील कोणा व्यक्तीला झाला असेल तर त्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक खास समिती नेमली जाणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.
ही समिती आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा कोणत्याही धोक्याशिवाय निर्विध्नपणे पार पडेल यासाठी 24 तास उपलब्ध असेल, असेही आयसीसीने जाहीर केले आहे.
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या पर्वात यंदाच्या मोसमात विविध संघातील खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यामुळे स्पर्धा स्थगित केली गेली होती. ही स्पर्धा आता अमिरातीत सुरु आहे.
मात्र, हेच चित्र आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत दिसू नये यासाठी आयसीसीने या समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत आयसीसीचा एक सदस्य व विविध देशांतील वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी करण्यात येणार आहेत.





