ICC Player of the Month Awards : रोहित-बुमराहला ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकन…

ICC Player of the Month Awards (June 2024) :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर जून महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ विजेतेपदासाठी दावेदारांची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियाला १७ वर्षांनंतर टी-२० विश्वकरंडकाचे जेतेपद मिळवून देणारे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानउल्ला गुरबाजचा समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्माने टी-२० विश्वकरंडकात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 8 सामन्यांत 36.71 च्या सरासरीने आणि 156.7 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 257 धावा केल्या. रोहितने सुपर-8 मध्ये विश्वकरंडकाचा सर्वांत मोठा दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूत 92 धावांची खेळी खेळली. उपांत्य फेरीतही त्याने गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध ३९ चेंडूत ५७ धावा केल्या होत्या.
बुमराह मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू…
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही टी-20 विश्वकरंडकात चांगली कामगिरी केली. त्याने 8 सामन्यात 4.17 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली आणि 15 विकेट्सही घेतल्या. तो टीम इंडियाचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूही होता.
गुरबाजच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा..
अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजची कामगिरीही टी-२० विश्वकरंडकात उत्कृष्ट होती. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता. गुरबाजने 124.33 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 8 सामन्यात 281 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 अर्धशतकेही झळकावली होती.





