Player of the Month : ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकन जाहीर! भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला मिळालं स्थान

Player of the Month nominees for October 2025 : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ नुकताच समाप्त झाला असून, याचसोबत आयसीसीने ऑक्टोबर महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंची घोषणा केली आहे. या यादीत महिला आणि पुरुष अशा दोन्ही विभागांतील खेळाडूंचा समावेश आहे.
महिला गटातील नामांकित खेळाडू –
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्मृती मानधना हिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नॉमिनेट करण्यात आले आहे. तिने वर्ल्ड कपमध्ये ९ सामन्यांत ५४.२५ च्या सरासरीने एकूण ४३४ धावा केल्या, ज्यात एका शतकाचा समावेश आहे.
Three prolific #CWC25 performers rewarded with the ICC Women’s Player of the Month nominations for October 2025 ✨
— ICC (@ICC) November 6, 2025
यापूर्वी मानधनाने या वर्षी एकदा हा पुरस्कार जिंकला आहे आणि आता तिला दुसऱ्यांदा तो जिंकण्याची संधी आहे. मानधनाव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट आणि ऑस्ट्रेलियाची अॅश्ले गार्डनर यांनाही या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. लॉरा वोल्वार्ड्ट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक (५७१) धावा करणारी खेळाडू ठरली. त्याचबरोबर अश्ले गार्डनरने ३२८ धावा केल्या.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी दीप्ती शर्माला हनुमानाच्या टॅटूबद्दल विचाल्यानंतर सर्वच आवाक
पुरुष गटातील नामांकित खेळाडू –
A trio of talented spinners are in the running for the ICC Men’s Player of the Month for October 2025 👌
— ICC (@ICC) November 6, 2025
ऑक्टोबर महिन्याच्या आयसीसी ‘मेन्स प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी तीन खेळाडूंना नॉमिनेट करण्यात आले आहे.
- सेनुरन मुथुसामी – दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज. पाकिस्तान दौऱ्यावर झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीमध्ये योगदान दिले. त्याने एकूण ११ बळी घेतले आणि १०६ धावा काढल्या.
- नौमान अली – पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत १४ बळी घेतले.
- राशिद खान – अफगाणिस्तानचा फिरकीपटू. ऑक्टोबर महिन्यात त्याचे शानदार प्रदर्शन दिसून आले, ज्यात त्याने टी-२० मध्ये ९ बळी आणि वनडेमध्ये ११ बळी घेतले.





