ICC | साहनी राजीनामा देण्याची शक्यता
Updated On:

नवी दिल्ली -आयसीसीचे मुख्य अधिकारी मनू साहनी यांना आयसीसीच्या कार्यकारी नियामक मंडळाने रजेवर जाण्यास सांगितले आहे. त्यांच्या व्यवस्थापन शैलीत त्रुटी आढळून आल्या असल्याचा अहवाल अंतर्गत चौकशीनंतर समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच साहनी राजीनामा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षिण आफ्रिकेचे डेव्ह रिचर्डसन यांच्याकडून 2019 मध्ये साहनी यांनी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता.





