ICC Big Decision : आयसीसीचा झटका! ‘या’ 2 संघाबाबत घेतला मोठा निर्णय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीची (ICC Big Decision) महत्त्वाची वार्षिक बैठक नुकतीच एडिनबर्ग येथे पार पडली. ८ जुलै ते ११ जुलै दरम्यान चाललेल्या या चार दिवसीय बैठकीत जागतिक क्रिकेटच्या भविष्याबाबत अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.

ICC Big Decision : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीची (ICC Big Decision) महत्त्वाची वार्षिक बैठक नुकतीच एडिनबर्ग येथे पार पडली. ८ जुलै ते ११ जुलै दरम्यान चाललेल्या या चार दिवसीय बैठकीत जागतिक क्रिकेटच्या भविष्याबाबत अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीत आयसीसीने (ICC Big Decision) वनडे (ODI) क्रिकेट आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) बाबत काही मोठे आणि दूरगामी निर्णय घेत विविध चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते निर्णय खालीलप्रमाणे..
1. वनडे क्रिकेट ५० षटकांचेच राहणार
गेल्या काही काळापासून वनडे क्रिकेटमधील प्रेक्षकांचा रस वाढवण्यासाठी आणि सामने अधिक रोमांचक करण्यासाठी ५० षटकांची संख्या कमी करून ती ४० करावी, अशी मागणी क्रिकेट जगतातून जोर धरत होती. अनेक माजी खेळाडूंनीही याला पाठिंबा दिला होता.
मात्र, आयसीसीने या बैठकीत ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. वनडे क्रिकेटमधील षटकांची संख्या कमी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ५० षटकांचेच सामने यापुढेही खेळवले जातील.
2. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ९ च संघ
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा अधिक व्यापक करण्यासाठी त्यातील संघांची संख्या ९ वरून १२ करण्याचा एक प्रस्ताव समोर आला होता. यामध्ये अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड या देशांच्या कसोटी संघांनाही समाविष्ट केले जाईल, अशा जोरदार बातम्या येत होत्या.
परंतु, या वार्षिक बैठकीत आयसीसीने हा प्रस्तावही गुंडाळला असून तूर्तास संघांची संख्या वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आगामी काळातही WTC मध्ये केवळ नऊ संघच एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील.
3. युएसए आणि कॅनडा क्रिकेटवरील निलंबन कायम
क्रिकेट प्रशासनातील अंतर्गत वाद आणि अकार्यक्षमतेमुळे आयसीसीने युएसए क्रिकेट (USA Cricket) आणि कॅनडा क्रिकेट (Cricket Canada) यांना निलंबित केले होते. या बैठकीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांबाबतचा आपला निर्णय आयसीसीने कायम ठेवला आहे. दोन्ही बोर्डांचे निलंबन तूर्तास मागे घेतले जाणार नाही, हे आयसीसीने स्पष्ट केले असून, तिथे सुधारणा होण्याची गरज असल्याचे संकेत दिले आहेत.
4. मॉरिशस बनला आयसीसीचा १११ वा सदस्य देश
या बैठकीत जागतिक क्रिकेटच्या विस्ताराच्या दृष्टीने एक सकारात्मक निर्णय घेण्यात आला. मॉरिशस क्रिकेट असोसिएशनला आयसीसीचे अधिकृत सदस्यत्व देण्यात आले आहे. वार्षिक बैठकीत मॉरिशसला ‘असोसिएट मेंबरशिप’ देण्यावर शिक्कामोर्तब झाले. या मंजुरीमुळे मॉरिशस हा आयसीसीचा (ICC Big Decision) सदस्यत्व मिळवणारा जगातील १११ वा देश ठरला आहे.






