Women T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकाच्या बक्षिसाची रक्कम जाहीर, विजेता संघ होणार मालामाल; मिळतील इतके कोटी रुपये…

Icc Women T20 World Cup 2024 Prize Money : महिला टी-20 विश्वचषक 2024 यूएईच्या भूमीवर आयोजित केला जाणार आहे. यापूर्वी विश्वचषक बांगलादेशमध्ये आयोजित केला जाणार होता. मात्र तेथील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आयसीसीने तो यूएईमध्ये करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टी-20 विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होतील, ज्याचे वेळापत्रक आयसीसीने आधीच जाहीर केले आहे.त्याबरोबरच आता आयसीसीने टी-20 विश्वचषक 2024 च्या विजेत्या, उपविजेत्या आणि इतर बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे.
आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2024 साठी अंदाजे $7,958,000 (रु. 66,64,72,090 कोटी) वाटप करण्याची घोषणा केली आहे, जी मागील हंगामाच्या दुप्पट रकमेपेक्षा जास्त आहे. विजेत्या बक्षीस रकमेत 134% ने वाढ करण्यात आली आहे आणि विजेत्या संघाला आता $2,340,000 (अंदाजे रु. 19,59,88,806 कोटी) मिळतील.तर उपविजेत्या संघाला $1170000 (अंदाजे रु. 9,79,78,432 कोटी) मिळतील.
उल्लेखनीय म्हणजे, सेमीफायनल आणि ग्रुप स्टेज मॅच विजेत्यांच्या बक्षीस रकमेतही वाढ करण्यात आली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन संघांना US$675,000 (₹ 5,65 कोटी) मिळतील, जी 2023 मधील US$210,000 रक्कमेपेक्षा 221% अधिक आहे. गट टप्प्यातील सामने जिंकणारे संघ US$31,154 घेऊन जातील.
⚡️ICC in a landmark move has announced that the Women’s T20 World Cup 2024 winners will receive equal prize money as offered to the men’s winners earlier this year pic.twitter.com/Kw0caJoY0Y
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 17, 2024
महिलांना पुरूषांच्या बरोबरीने मिळेल बक्षीस रक्कम…
आयसीसीच्या विधानानुसार, महिला टी-20 विश्वचषक 2024 ही पहिली ICC स्पर्धा असेल ज्यामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने बक्षीस रक्कम मिळेल, जी खेळाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी असेल. जुलै 2023 मध्ये ICC वार्षिक परिषदेत हा निर्णय घेण्यात आला होता जेव्हा ICC बोर्डाने त्याच्या पूर्व नियोजित 2030 च्या वेळापत्रकाच्या सात वर्षे आधी बक्षीस रक्कम समान करण्याचा निर्णय घेतला होता.अशाप्रकारे क्रिकेट हा पहिला मोठा खेळ बनला आहे ज्यात विश्वचषकासाठी पुरुष आणि महिलांसाठी समान बक्षीस रक्कम आहे. या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाचा विजेता बनल्याबद्दल भारतीय पुरुष संघाला 23 लाख 40 हजार यूएस डॉलर्सची ( $2,340,000) बक्षीस रक्कम मिळाली होती.
3 ऑक्टोबरपासून सुरू होणार विश्वचषकाचा थरार..
महिला T20 विश्वचषक 2024 युएईमध्ये 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताला अ गटात ठेवण्यात आले आहे. या गटात भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.





