Tukaram Mundhe : हॉटेल्समध्ये पिण्याचे शुद्ध पाणी आता मोफत मिळणार! आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा आदेश; फलक लावणे सक्तीचे
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात सुरू केलेला धडक कारवायांचा धडाका आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

Tukaram Mundhe : गेल्या काही काळात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत राहिले आहेत. या विभागाचा पदभार सांभाळतच त्यांनी अनेक महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय घेत राज्यातील अनेक हॉटेल, रेस्टॉरेंट्स आणि ढाब्यांवर कारवाया केल्या केल्या आहेत. (Tukaram Mundhe)
राज्यातील नागरिकांना उत्तम आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. या अंतर्गत तुकाराम मुंढे यांनी सर्वांनीच नियमांची अंमलबजावणी करावी, नाहीतर कारवाई करण्यात येईल, असे आदेशच बुधवारी घेतलेल्या परिषदेत दिले आहेत. (Tukaram Mundhe)
प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटने ग्राहकांना पिण्यायोग्य तसेच सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे. तसेच, ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी, येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत. (Tukaram Mundhe)
या सर्व नियमांची आणि सूचनांची योग्य अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे फक्त अन्नसुरक्षाच नव्हे तर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नालाही तेवढेच महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे. (Tukaram Mundhe)
अन्नात कुठेही भेसळ होऊ नये, यासाठी काही पावले उचलण्यात येतात. त्याची जबाबदारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांवर असते. 23 जून रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इटरिज (ढाबे व इतर भोजनालये) यांनी नियम पाळणे बंधनकारक असेल. (Tukaram Mundhe)
अन्न व सुरक्षा मानके यानुसार त्यांनी रजिस्ट्रेशन करावे. अन्न उत्पादन मानके, 2011 याच्यासह अनेक नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच शाळेच्या मुलांच्या सुरक्षेसाठी नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (Tukaram Mundhe)






