IAS टीना डाबी यांची मोठी कारवाई! सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश

देशातील प्रसिद्ध आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये टीना डाबी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्या आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. त्यांची गेल्या महिन्यात राजस्थानच्या बारनेरमध्ये जिल्हाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यापासून त्या अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. त्या कोणत्या ना कोणत्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात.
आज सकाळी टीना डाबी यांनी एका स्पा सेंटरवर धाड टाकली. या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचा आरोप होता. पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ स्वच्छता मोहीम सुरू असताना अचानक टीना डाबी तपासणीसाठी पोहोचल्या होत्या. तपासणीदरम्यान, टीना डाबी यांना एक स्पा सेंटर दिसले ज्याचे दरवाजे आतून बंद होते. त्यांनी अधिकाऱ्यांना हे दरवाजे उघडण्यास सांगितलं. मात्र अनेकदा दार ठोठावूनही कोणीच दरवाजा उघडला नाही.
यानंतर संशय वाढल्याने पोलीस छतावरुन स्पा सेंटरमध्ये पोहोचले. तर काहींनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. स्पा सेंटरमध्ये अनेक खोल्या होत्या, ज्यामध्ये पाच मुली आणि दोन पुरुष आक्षेपार्ह स्थितीत सापडले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर पोलीस ठाण्याने या सर्वांना देहविक्रीच्या संशयावरून ताब्यात घेतलं असून या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. IAS टीना डाबी यांनी केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक केले जात आहे.





